2026

brandkop

हार्दिक अभिनंदन !

ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव 2026

प्रा. डॉ. वसंतराव मोरे

प्रा. डॉ. वसंतराव मोरे

प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांनी मराठा साम्राज्य आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज व पानिपतच्या युद्धाच्या इतिहासावर मोलाचे संशोधन केले आहे.पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा सखोल अभ्यास करुन हरियाणातील 'रोड मराठा' समुदायाचा शोध आणि त्यांचा पानिपतच्या युद्धाशी असलेला ऐतिहासिक संबंध समोर आणण्यात मोठे योगदान दिले आहे.

डॉ. शरद भुथाडिया

डॉ. शरद भुथाडिया

डॉ. शरद भुथाडिया यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. कोल्हापुरातील प्रत्यय नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांमधून अभिनय तसेच दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. 'राजा लियर' या नाटकातील अभिनयामुळे अनेक मानसन्मान प्राप्त झाले. व्यावसायिक नाटकांसह अनेक टीव्ही सिरीयल्स तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. "दृश्यम" या हिंदी चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली. याशिवाय चेतना अपंगमती संस्थेचे संस्थापक सदस्य असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत.

ब्रँड कोल्हापूर 2026

ऋषिकेश आलासे

ऋषिकेश आलासे

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जयसिंगपूरच्या ऋषिकेश यांनी युपीएससी स्पर्धेत देशात 61 वा क्रमांक मिळविला आहे. प्राथमिक शिक्षण सांगली आणि त्यानंतरचे शिक्षण मुंबईत झाले. दोन वेळा यश हुकले पण पुन्हा चिकाटीने हे यश मिळविले.

रोहित मालवेकर

रोहित मालवेकर

युपीएससी मधून एकाच वर्षात दोन पदांवर निवड, सिव्हिल सर्व्हिसेस ऑल इंडिया रँक 601, फॉरेस्ट सर्व्हिस ऑल इंडिया रँक 62.

पांडुरंग फोंडे

पांडुरंग फोंडे

अत्यंत प्रतिकुल परिस्थीवर मात करत धनगरवाडा (ता. राधानगरी) या दुर्गम गावातून येत यूपीएससी परिक्षेत 252 वा क्रमांक मिळविला आहे. अडचणींवर मात करुन त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.

हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील

शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावचे सुपुत्र असलेले हर्षवर्धन हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टीसीएसमध्ये साफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांनी नोकरी केली. युपीएससी परीक्षेत 349 वी रँक मिळविली असून या यशात त्यांच्या 40 जणांच्या एकत्र कुटूंबाचा सिंहाचा वाटा आहे.

प्रथमेश शिंदे

प्रथमेश शिंदे

घरची परिस्थिती बेताची असताना मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत देशभरात 817 वी रँक मिळविली आहे. वडील आजारांचा सामना करत असताना आई दिपाली यांनी मजुरीचे काम करत तसेच मामा सोमनाथ व आजोळच्या नातेवाईकांनी दिलेल्या पाठबळाच्या जोरावर हे यश मिळविले आहे.

जुही अरुण धारवाडे

जुही अरुण धारवाडे

ग्लोबल शेपर्स कोल्हापूर हब’ची क्युरेटर जुही अरुण धारवाडेची स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (WEF) २०२६ च्या वार्षिक परिषदेसाठी निवड झाली. या परिषदेत जगातील ५२८ क्युरेटर्स सहभागी झाले. जुहीने कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा, उद्योजकीय क्षमता तसेच तंत्रज्ञान व मेकॅनिकल उद्योगातील प्रगती जागतिक नेते आणि धोरणकर्त्यांसमोर मांडली.

सई जाधव

सई जाधव

घरचा देशसेवेचा वारसा पुढे चालविण्याचे स्वप्न पाहिलेल्या सई यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी च्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला अधिकारी कॅडेट म्हणून प्रशिक्षण पूर्ण करुन लेफ्टनंट पदाची सुत्रे हाती घेण्याचा मान मिळविला आहे. ही संस्था फक्त पुरुष प्रशिक्षणार्थींना ट्रेनिंग देते पण सई यांनी ही चौकट मोडून बाजी मारली आहे.

जितेंद्र करंबे

जितेंद्र करंबे

लाल मातीतून घडलेला राष्ट्रीय ज्युदोपटू ते आंतरराष्ट्रीय शेफ म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जितेंद्र यांनी केमन बेटावर झालेल्या आंतरराष्ट्रीय शेफ स्पर्धेत जगभरातील 300 शेफ मधून उत्कृष्ट शेफचा बहुमान पटकाविला आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कोष्टा कंपनीत शेफ म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. ऋषिकेश पोळ

डॉ. ऋषिकेश पोळ

स्पोर्टस फिजीओथेरपिस्ट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी. ऑस्टेलिया कबड्डी टीमचे मुख्य फिजीओथेरपिस्ट म्हणून कॉमन वेल्थ कबड्डी चॅम्पीयनशीप 2026 मध्ये काम पाहिले. त्याचबरोबर फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट या खेळासाठी विविध अकॅडमी आणि असोसिएशनसाठी स्पोर्टस फिजीओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

वैभवी चव्हाण

वैभवी चव्हाण

लंडन येथील रेवेन्सबोर्न विद्यापीठात वरिष्ठ व्याख्यात्या म्हणून कार्यरत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (पीएमआय) या संस्थेने जगभरातील विविध क्षेत्रात कार्यरत 35 वर्षाखालील तरुण तरुणींच्या तयार केलेल्या 50 जणांच्या यादीत स्थान. हेल्थ केअर पासून बांधकाम इलेक्ट्रिक, ट्रान्सपोटेशन ते शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरुण पिढीची ही यादी आहे.

डॉ. महेश शिंदे

डॉ. महेश शिंदे

कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि विविध खेळांसाठी स्पोर्टस फिजीओथेरपिस्ट म्हणून कार्यरत. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजन्डस 2026 या स्पर्धेसाठी साऊथ अफ्रिका कबड्डी टीमचे मुख्य फिजीओथेरपिस्ट म्हणून काम पाहीले. तसेच 2022 आणि 2023 मध्ये भारतीय कबड्डी टीमला एशियन कबड्डी चॅम्पीयनशीप मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. प्रो कबड्डी मध्ये पटणा पायरट्स, गुजरात जायंटस यासारख्या संघाना मार्गदर्शन.

पूजा पावसकर

पूजा पावसकर

सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत 'नमस्ते भारत ब्युटी क्वीन'चा किताब. या स्पर्धेत मुळचे भारतीय असलेल्या व भारतातून सिंगापूर मध्ये स्थायिक झालेल्या 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पूजा पावसकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.

मोनिका एकल

मोनिका एकल

अंतराळ संशोधन क्षेत्रात झेप घेतलेल्या डॉ. मोनिका या भुवनेश्वर येथील 'सेरेन्डिपिटी स्पेस' या स्पेस फार्मा स्टार्टअपच्या सहसंस्थापक व स्पेस सिस्टीम प्रमुख आहेत. मायक्रो ग्रॅव्हेटीमध्ये औषध निर्मितीवर संशोधन करुन कॅन्सरवरील औषधे आणि प्रगत उपचारांच्या संशोधनाला नवी दिशा देण्यासाठी कार्यरत आहेत.

शुभम सुतार

शुभम सुतार

शिल्पकार शुभम यांच्या शिल्पकृतीची लंडन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या “The Quiet Warmth” या शिल्पकृतीचा समावेश FACE 2026 – Society of Portrait Sculptors आयोजित वार्षिक प्रदर्शनात करण्यात आला.जगभरातील निवडक कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित झाल्या. शुभम हे पोर्ट्रेट आणि फिगरेटिव्ह शिल्पकलेत कार्यरत असून मानवी भावना, व्यक्तिमत्व आणि सूक्ष्म तपशील वास्तववादी पद्धतीने साकारण्यामध्ये त्यांची स्वतंत्र शैली ओळखली जाते.

विश्वजित मोरे

विश्वजित मोरे

भारतीय सैन्य दलाचे जवान सरवडे येथील विश्वजित यांनी अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद 55 किलो वजनी गटात ग्रिको रोमन प्रकारात रौप्य पदक मिळविले.

अमृता पुजारी

अमृता पुजारी

अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या 23 वर्षाखालील महिलांच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 72 किलो वजनी गटात रौप्य पदक

सानिका माने

सानिका माने

चीनला नमवून आशिया हॉकी चषकावर भारताने नाव कोरले आणि या विजयात नूल, ता. गडहिंग्लज येथील इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलची हॉकी खेळाडू सानिका चंद्रकांत माने हिने एकमेव गोल नोंदवत 'प्लेयर ऑफ दि मॅच'चा किताब पटकाविला.

रोहित चव्हाण

रोहित चव्हाण

अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. अगदी काही सेकंदाच्या फरकाने जपानच्या स्पर्धकाने पहिला क्रमांक मिळविला.

स्वप्नाली मगदूम

स्वप्नाली मगदूम

स्वप्नालीने अमेरिकेतील 'एसरी'च्या भारतीय शाखेने घेतलेल्या 'यंग स्कॉलर' स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आधुनिक जिओ स्पॅशियल तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेल्या संशोधनामध्ये महापूराचे रियलटाईम मॉनिटरींग, पूर्वसूचना, सुरिक्षतपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग अशी यंत्रणा विकसित केली आहे. मोबाईल ॲप व आयओटी टेक्नॉलॉजीचा वापर करुन ही प्रणाली तयार केली आहे.

डॉ. नंदिता परांजपे-जोशी

डॉ. नंदिता परांजपे-जोशी

डॉ. नंदिता यांनी बुसलटन फुल आयर्नमॅन २०२५ – १५ तास ४१ मिनिटांत यशस्वी पूर्ण केली आहे.
सन २०१२ पासून कोल्हापुरात तर २०१९ पासून एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर येथे त्या सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच IVF विशेषज्ञ म्हणून सेवा देत आहेत.
वैद्यकीय व्यवसायासोबतच त्यांनी साहसी क्रीडा क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चार वेळा गोवा हाफ आयर्नमॅन तसेच बहरीन हाफ आयर्नमॅन, केएससी लोहपुरुष हाफ आयर्नमॅन, हरक्युलियन हाफ आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग.
अनेक हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण. तीन स्विमॅथॉन स्पर्धांमध्ये सहभाग.

वेदांती मनगुतकर

वेदांती मनगुतकर

वेदांतीने हरियाणा येथे झालेल्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. ग्रामीण भागातून येऊन जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे.

शांभवी श्रावण क्षीरसागर

शांभवी श्रावण क्षीरसागर

शांभवीने दिल्ली येथील एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेत १० मी. एअर रायफल प्रकारात २५३.७ गुणांची कमाई करून जागतिक रेकॉर्डसह २ सुवर्ण पदके मिळविली आहेत.

हृषीकेश कबनुरकर

हृषीकेश कबनुरकर

हृषीकेश याने दिल्ली येथे आयोजित ओपन ग्रँड मास्टर 'बी कॅटॅगरी' बुद्धिबळ स्पर्धेत दहावा क्रमांक तसेच स्पर्धेत संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे. देशभरातील 858 बुध्दीबळ पटूंचा सहभाग होता.

ऋतुजा गुरव

ऋतुजा गुरव

ऋतुजाने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे.

मधुरिमा सावंत

मधुरिमा सावंत

मधुरिमाने तुर्की येथे आयटीएफ डब्ल्यू १५ महिला टेनिस स्पर्धेत अमेरिकन सहकारी सेरेना हिच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद मिळविले. तिचे हे दुसरे हे आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून दोन वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. आयटीएफ गुणांकनात 256 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

गौरव पाटील

गौरव पाटील

थायलंड येथे आयोजित आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत 75 किलो वजनी गटात ग्रिको रोमन प्रकारात रौप्य पदक. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सलग 3 सुवर्ण पदके जिंकली आहेत.

आदित्य जाधव

आदित्य जाधव

व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक. यापूर्वी हरियाना येथील अंडर 17 कॅडेट कुस्ती स्पर्धेत ग्रिको रोमन प्रकारात सुवर्ण पदक

तन्वी मगदूम

तन्वी मगदूम

स्लोव्हाकिया येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक

देवेन महेंद्र पवार

देवेन महेंद्र पवार

हैद्राबाद येथील २५ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये दुसरा, ५० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये तिसरा क्रमांक मिळविला.

जिजाऊ पाटील

जिजाऊ पाटील

जिजाऊ ही उत्तराखंड येथे झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिलीच महाराष्ट्रीयन खेळाडू, यापूर्वी थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. तसेच आशियाई कॅडेट फेन्सिंग आणि जागतिक कॅडेट फेन्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.