2018

BrandKopGroup-2018

हार्दिक अभिनंदन !

अभिनंदन पाटील - स्टार्टअप

अभिनंदन पाटील

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचा अभिनंदन पाटील याने दुधाच्या भूकटीपासून विकसित केलेली कर्करोग प्रतिबंध पावडर राज्यातील सर्वोकृष्ट स्टार्टअप ठरला आहे. त्यांना स्टार्ट अप हिरो ऑफ द स्टेट म्हणून व्हिएनआयटी, नागपूर मध्ये एक लाखाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

अहिल्या चव्हाण - अ‍ॅडव्हेंचर

अहिल्या चव्हाण

कु. अहिल्या सचिन चव्हाण हिने इजिप्त मध्ये झालेल्या बाइथलॉन व ट्रायथलॉन अ‍ॅडव्हेंचर स्पर्धेत आपल्या देशाला सिल्व्हर मेडल मिळवून दिले. तसेच सांघिक प्रकारात ब्राँझ मेडल मिळविले. अहिल्या विवेकानंद कॉलेजमध्ये बी.बी.ए. शिकत आहे.

अनुजा पाटील - क्रिकेटपटू

अनुजा पाटील

कोल्हापूरची नामवंत क्रिकेटपटू वेस्ट इंडिज येथे सुरु असणा­या आयसीसी महिला टी ट्वेंटी वल्र्डकप साठी भारतीय संघात निवड.

अनुष्का पाटील - नेमबाजी

अनुष्का पाटील

आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रविंद्र पाटील हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सांघिक तीन सिल्व्हर मेडल्स मिळविली आहेत. जपान मध्ये झालेल्या 10 व्या आशियाई स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

पै. दादू चौगले मामा - कुस्तीपटू

पै. दादू चौगले मामा

वयाच्या 10 व्या वर्षी लाल मातीच्या आखाड्यात यांनी प्रवेश केला आजपर्यंत महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी या मानाच्या गदा त्यांनी मिळविल्या आहेत.  त्यांच्या या कामगिरीची दखल केंद्र शासनाने ध्यानचंद पुरस्कार देवून यथोचित सन्मान केला.

ध्रुव मोहिते - रेसिंग

ध्रुव मोहिते

वेगाचे वेड असणाऱ्या शिवाजी मोहिते यांचा हा सुपूत्र. कोल्हापूरातील मोहितेज रेसिंग अकॅडेमी मध्ये अनेक जण घडले. ध्रुव सुध्दा त्यापैकी एक. त्याने ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे पार पडलेल्या 2018 वोल्कस्वगोन एमेओ कप चा किताब पटकावला.

दुर्गाप्रसाद दासरी - बॉडीबिल्डींग

दुर्गाप्रसाद दासरी

इंटरनॅशनल बॉडीबिल्डींग चॅम्पियनशीप डायमंड कप 2018 स्पर्धेत 85 किलो वजनी गटात ब्राँझ पदक मिळविले. यामध्ये देशातील नामवंत बॉडी बिल्डर्स व बाहेरील 14 देशातील खेळाडू सहभागी झाले होते. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके मिळवीली आहेत.

राजमल्हार व्हटकर-तायजीकॉन वुशू

राजमल्हार व्हटकर

बल्गेरिया युरोप येथे झालेल्या तिस­या जगतिक तायजीकॉन वुशू स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवीले. यासाठी त्यांनी शाँगडॉग चायना येथे एक महिन्याचे अ‍ॅडव्हान्स ट्रनिंग घेतले होते.

रेश्मा माने - कुस्ती

रेश्मा माने

कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी. आजपर्यंत अनेक नामवंत मल्लांनी कोल्हापूरच्या कुस्तीचा झेंडा अटकेपार नेला आहे. आपल्या कौशल्याने रेश्मा सुध्दा या रांगेत जावून बसली आहे. तिचे वडील अनिल यांनी खास तिच्यासाठी घराशेजारी कुस्तीचा आखाडा तयार केला आहे.

सुहास खामकर - बॉडी बिल्डर

सुहास खामकर

मिस्टर ऑलम्पिया अ‍ॅमॅच्युअर 2018 स्पर्धेत सुहासने सुवर्ण पदक मिळविले आहे. या स्पर्धेत 70 देशातील 500 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. ज्याच्याकडून बघून कोल्हापूरच्या तरुणाईला आपण सुध्दा बॉडी कमवावी असे वाटते तो बॉडी बिल्डर म्हणजे सुहास.

डॉ. शरद बनसोडे - बास्केट बॉल

डॉ. शरद बनसोडे

अनेक नामवंत खेळाडू बनसोडे सर यांनी घडविले आहेत. कोल्हापूर जिल्हा बास्केट बॉल संघटनेचे संघटक म्हणून ते कार्यरत आहेत. एफआयबीए आशिया महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून त्यांची निवड झाली होती. या स्पर्धेतून विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्या तीन संघांची निवड करण्यात आली.

श्रेया देशपांडे - टेनिस

श्रेया देशपांडे

टेनिस खेळात ऑल इंडिया रँकिंग चॅम्पीयनशीप सिरीज टूर्नामेंट अंडर 14 मुली ही स्पर्धा जिंकली आहे. रनरअप :- ऑल इंडिया रँकिंग टॅलेंट सिरीज अंडर 12 मुली. विजेतेपद :- ऑल इंडिया रँकिंग टॅलेंट सिरीज सेव्हन स्पर्धा अंडर 12.

शाहू माने - नेमबाजी

शाहू माने

वर्षीय शाहू तुषार माने याने अर्जेंटिना येथे झालेल्या युवा ऑलम्पिक स्पर्धेत भारताला नेमबाजी मधील 10 मी. एअर रायफल प्रकारात पहिले रौप्य पदक मिळून दिले.

स्वप्निल पाटील - जलतरण

स्वप्निल पाटील

जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या एशिअन पॅरा गेम्स 2018 मध्ये , आपल्या कोल्हापूरातील स्वप्नील संजय पाटील याने पोहण्याच्या स्पर्धेत 100 मी. 1 सुवर्णपदक, 400 मी. फ्रीस्टाईल प्रकारात 1 ब्राँझ पदक मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला आहे. त्याच्या ह्या यशाबद्दल अभिनंदन.

विरधवल खाडे - जलतरण

विरधवल खाडे

जलतरण स्पर्धेतील कोल्हापूरचा हुकमी एक्का. केंद्रशासनाचा अर्जुन ॲवॉर्ड विजेता. एशीयन गेम्समध्ये 50 मीटर बटरफ्लायमध्ये ब्राँझ मेडेल. बिजींग ऑलंपिकमध्ये सहभाग. 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये इंडियन नॅशनल रेकॉर्ड.

सुखदेव पाटील - फुटबॉल

सुखदेव पाटील

गोलरक्षक म्हणून दैदिप्यमान कामगिरी. भारतीय फुटबॉल मधील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या इंडियन सुपल लीग आयएसएल स्पर्धेसाठी दिल्ली डायनामोज संघात निवड. पुण्याची शासकीय क्रीडाप्रबोधनी, पुणे एफसी, डीएसके शिवाजीयन्स, एफसी गोवा, या संघात निवड. 

प्रेरणा आवळेकर

प्रेरणा आवळेकर

स्कुल गेम्स ऑफ इंडिया एशियन टुर्नामेंटसाठी भारतीय संघात निवड.
स्कुल गेम्स ऑफ इंडिया वर्ल्ड टुर्नामेंटसाठी भारतीय संघात निवड.
खेलो इंडिया गेमसाठी दिल्ली येथे निवड.

मेधप्रणव पवार - दिग्दर्शक

मेधप्रणव पवार

इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करणा­या मेधप्रणवने पुण्यात नोकरी स्विकारली खरी. पण सिनेनाट्य क्षेत्रातील आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी सांभाळत पुण्यातील विविध नाट्य संस्थांमध्ये अभिनयाचे धडे गिरवीले. या आवडी पोटीच त्यांने जगप्रसिध्द फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून दिग्दर्शकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

भूषण गांधी

भूषण गांधी

अमेरिका तसेच जर्मनी येथील सैन्य व वायू दलाकडून विविध शस्त्रे, मिसाईल मध्ये झुल्केनियम पावडरचा वापर केला जातो. उच्च दर्जाच्या या पावडरची निर्मिती जगात पूर्वी एकच कंपनी करत होती. अमेरिकेतील सैन्य दलाने सुध्दा भूषण यांचा नुकताच सत्कार केला आहे.

चिदंबरम शिंदे

चिदंबरम शिंदे

चिदंबरम हे कागदी पेन बनवण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. या पेनामध्ये ते वांगी, मिरचीच्या बिया ठेवल्या जातात, त्यामुळे, पेनाचा वापर करुन झाल्यानंतर तो कुठेही टाकला असता त्याचे नंतर बिया रुजून रोप तयार होते.

दिपक सावंत

दिपक सावंत

यांना इन्स्टंट टी.बी. टेस्टिंग सेन्सर साठी "इनोव्हेशन इन हेल्थ केअर साठी पहिला क्रमांक मिळाला आहे.

आदित्य अनगळ - फेंसिंग चॅम्पियनशीप

आदित्य अनगळ

न्यू कॅसल इंग्लंग येथे झालेल्या कॅडिट ऍण्ड ज्युनिअर कॉमनवेल्थ फेंसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्राँझ मेडेल. दुबईत झालेल्या एशीयन फेंसिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभाग.
ऑल इंडिया इंटर साई फेंसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत 4 गोल्ड व 1 सिलव्हर मिळवीले.

सोनल सावंत - पॉवर लिफ्टींग

सोनल सावंत

राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीले आहे. 57 किलो गटात हे पदक मिळवीले आहे. यंदाच्या वर्षात तिने तीन सुवर्णपदके मिळवीली आहेत. राज्य जीवन गौरव पुरस्काराने सुध्दा सन्मान केला आहे.

प्रियांका पाटील

प्रियांका पाटील

हिलींग ड्रेसिंग मटेरियल साठी हेल्थकेअर इन इनोव्हेशन साठी दुसरा पुरस्कार मिळाला आहे .हे तीन संशोधक डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर मध्ये रिसर्च स्कॉलर आहेत. त्यांना प्रा. डॉ. एस. एच. पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.