2023

Brand Kolhapur Group Photo 2023

हार्दिक अभिनंदन !

ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव 2023

श्री. कुमार आगळगावकर

श्री. कुमार आगळगावकर

हॉकी या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्री. आगळगावकर यांनी अतुलनीय काम केले आहे. 1962 साली त्यांनी महाराष्ट्र क्रीडा मंडळाची स्थापना करुन अनेक खेळाडूंना हॉकीचे तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले. यामध्यमातून अनेक नामवंत खेळाडू त्यांनी तयार केले. 1980 मध्ये हॉकीच्या प्रचारासाठी दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन कोल्हापूरची स्थापना त्यांनी केली. 1980 मध्ये भारत विरुध्द रशिया हा आंतरराष्ट्रीय महिला हॉकी कसोटी सामना तसेच 1986 तध्ये भारत विरुध्द पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकीचा सामना शिवाजी स्टेडियमवर घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या स्पर्धांबरोबरच राष्ट्रीय कुमार गट हॉकी स्पर्धा यासह अनेक स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या आहेत. 

श्रीमती विजयमाला बाबुराव मेस्त्री (पेंटर)

श्रीमती विजयमाला बाबुराव मेस्त्री (पेंटर)

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या कन्या असलेल्या विजयमाला यांनी आपल्या घराण्याचा कला क्षेत्राचा वारसा समर्थपणे चालविलेला आहे. भरतकाम मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. 1976 आणि 1994 मध्ये अखिल भारतीय स्तरावरील त्यांच्या कामाला पहिले बक्षीस मिळाले आहे. साडीवरील फुलांचे क्रायलिन पेंटींग करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

विशेष सत्कार

स्वप्निल संजय पाटील

स्वप्निल संजय पाटील

आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील - बि.ए.(पोली सायन्स),
# शिवछत्रपती पुरस्कार विजेता-दिव्यांग (२०१९ महाराष्ट्र शासन),
# अर्जुन ॲवार्डी-दिव्यांग (२०२२ भारत सरकार),
# पॅरा एशियन मेडलिस्ट (२०१४,२०१८,२०२२),
# पॅरा एशियन रेकॉर्ड होल्डर (२०१५,२०१७)

पै. सिकंदर शेख

पै. सिकंदर शेख

यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी किताब लढतीत पै. सिकंदर शेख याने अवघ्या 20 सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा आणि महिंद्रा थार गाडी पटकावली. तो गंगावेश तालमीचा कुस्तीपटू असून या तालमीला 39 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिला आहे. वस्ताद विश्वास हारुगले यांचे मार्गदर्शन लाभले.

शाहीर राजू राऊत

शाहीर राजू राऊत

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा शाहिरी क्षेत्रातील 2023 सालचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार शाहीर राजू राऊत यांना जाहीर झाला आहे. गेली 28 वर्षे शाहीरच्या माध्यमातून शिव-शाहूंचे कार्य जन मानसापर्यंत पोहचविताना सद्याच्या राजकीय, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारे पोवाडे त्यांनी सादर केले. सलग 14 वर्षे शिवराज्याभिषेक सोहळ्यात त्यांनी शाहिरी सादर केली.

सचिन कुंभोजे

सचिन कुंभोजे

हेलसिंकी फिनलँड येथे होणाऱ्या स्लश 2023 साठी भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 30 स्टार्टअप मध्ये श्री. कुंभोजे यांच्या श्री एज्युटेक या स्टार्टअपची निवड झालेली आहे. स्लश मध्ये जगभरातील 5 हजार स्टार्टअप फौंडर्स आणि 3 हजार इन्वेस्टर्स तसेच 3 हजार इकोसिस्टम प्लेर सहभागी होणार आहेत.

वैष्णवी दत्तात्रय पाटील

वैष्णवी दत्तात्रय पाटील

पाडळी खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात आपण वाढलात. रग्बी सारख्या खेळामध्ये नैपुण्य मिळवत तीन राज्यस्तरीय आणि एका शालेय राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार यश मिळविले. या जोरावर ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आणि या संघाने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. यंदा चीन येथील आशियाई स्पर्धेसाठी भारतीय रग्बी संघात त्यांची निवड झाली आहे.

वैष्णवी दत्तात्रय पाटील

वैष्णवी दत्तात्रय पाटील

पाडळी खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात आपण वाढलात. रग्बी सारख्या खेळामध्ये नैपुण्य मिळवत तीन राज्यस्तरीय आणि एका शालेय राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार यश मिळविले. या जोरावर ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आणि या संघाने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. यंदा चीन येथील आशियाई स्पर्धेसाठी भारतीय रग्बी संघात त्यांची निवड झाली आहे.

ब्रँड कोल्हापूर 2023

हार्निश अतुल सवसानी

हार्निश अतुल सवसानी

क्वाईंग डेस्क या संस्थेतर्फे आयोजित वेब थ्रिएथोन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हार्निशने बनविलेल्या आपत्ती व्यवस्थापन करणारे ॲप आणि वेबसाईटला द्वितीय क्रमांकाचे 12 लाखाचे पारितोषिक मिळाले आहे. नासा ने दिलेल्या डेटाच्या आधारे डेटाअनॅलिस करुन ही प्रणाली विकसित केली आहे.

डॉ. करण शाम देवणे

डॉ. करण शाम देवणे

मंगळवार पेठ येथील डॉ. करण हे आयआयटीएन असून अमेरिकेतील वेक फॉरेस्ट स्कूल ऑफ मेडिसिन या युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. या संस्थेत काम करताना त्यांनी तयार केलेला एक प्रस्ताव नासाने विशेष निधीसह मंजूर केला आहे. अंतराळ मोहिमेत यान हे अंतराळात उड्डान करताना आणि पृथ्वीवर उतरताना त्यातील महिला आणि पुरुष अंतराळवीरांना होणारी इजा त्यातील फरक याचा अभ्यास त्यांनी यामध्ये सादर केला आहे.

राशी अमृत पारख

राशी अमृत पारख

राशी ही दि इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जून 2023 मध्ये घतलेल्या कंपनी सेक्रेटरी परिक्षेत देशात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नातच वयाच्या 19 व्या वर्षी तिने हे यश मिळवीले आहे. ऐन परीक्षेवेळी मानसीक तणावामुळे तब्येत बिघडूनही जिद्दीने तिने हे यश मिळविले आहे.

रावी किशोर

रावी किशोर

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील २३ व्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल मध्ये वाट या एकमेव मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका. 2019 मधील सुवर्णमहोत्सवी इफ्फी मधील विशेष स्पर्धेत राष्ट्रीय विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.

विशाल विलास गुडूळकर

विशाल विलास गुडूळकर

आरआरआर या ब्लॉकबस्टर फिल्म मधील नाटू नाटू सह जननी या दोन गाण्यांचे व्हीएफएक्स इडिटींग रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथील कि फ्रेम स्टुडिओ मध्ये झाले आहे. तसेच त्यांनी यशराज फिल्म, प्राईम फोकस, रेड चिलिज, एनवाय व्हीएमएक्स यासारख्या कंपन्यांचे काम केले आहे. यापूर्वी या टिमने टोटल धमाल, बाहुबली 2, सिंबा, माऊली, हिरकणी, प्यारवाली लव्हस्टोरी, नेटफ्लिक्स वरील वेबसिरीज आणि आयपीएलच्या दोन सिजनच्या जाहीरातींचे इडिटींग केले आहे.

वासिम इक्बाल मुल्लाणी

वासिम इक्बाल मुल्लाणी

आरआरआर या ब्लॉकबस्टर फिल्म मधील नाटू नाटू सह जननी या दोन गाण्यांचे व्हीएफएक्स इडिटींग रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथील कि फ्रेम स्टुडिओ मध्ये झाले आहे. तसेच त्यांनी यशराज फिल्म, प्राईम फोकस, रेड चिलिज, एनवाय व्हीएमएक्स यासारख्या कंपन्यांचे काम केले आहे. यापूर्वी या टिमने टोटल धमाल, बाहुबली 2, सिंबा, माऊली, हिरकणी, प्यारवाली लव्हस्टोरी, नेटफ्लिक्स वरील वेबसिरीज आणि आयपीएलच्या दोन सिजनच्या जाहीरातींचे इडिटींग केले आहे.

मधुर अजित चांदणे

मधुर अजित चांदणे

आरआरआर या ब्लॉकबस्टर फिल्म मधील नाटू नाटू सह जननी या दोन गाण्यांचे व्हीएफएक्स इडिटींग रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथील कि फ्रेम स्टुडिओ मध्ये झाले आहे. तसेच त्यांनी यशराज फिल्म, प्राईम फोकस, रेड चिलिज, एनवाय व्हीएमएक्स यासारख्या कंपन्यांचे काम केले आहे. यापूर्वी या टिमने टोटल धमाल, बाहुबली 2, सिंबा, माऊली, हिरकणी, प्यारवाली लव्हस्टोरी, नेटफ्लिक्स वरील वेबसिरीज आणि आयपीएलच्या दोन सिजनच्या जाहीरातींचे इडिटींग केले आहे.

अनुष्का नागोंडा पाटील

अनुष्का नागोंडा पाटील

युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ( युनिस्को ) तर्फे घेण्यात आलेल्या जागतिक छायाचित्र स्पर्धेत अनुष्का पाटील हिने वयाच्या 14 व्या वर्षी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. संपूर्ण जगातून आर्किटेक्चर, स्मारके आणि शहरीकरण या विषयातून अनुष्काने क्लिक केलेल्या आणि युनिस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या हंपी येथील श्रीकृष्ण पुष्करणी येथे लहान मुली आनंदाने खेळत असलेल्या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेसाठी जगभरातून शंभर देशातून सुमारे सहा हजार सातशे छायाचित्रकार सहभागी झाले होते.

नागेश हंकारे

नागेश हंकारे

सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल मधील सहाय्यक शिक्षक आणि चित्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री हंकारे यांच्या कलाकृतीला ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्लीमार्फत आयोजित केलेल्या 95 व्या वार्षिक कला प्रदर्शनातील एकूण 731 कलाकृतीमधून "ब्युटी ऑफ नेचर" या चित्राची निवड झाली असून या चित्रास "मनोहर कौल मेमोरियल कॅश अवॉर्डनी" सन्मानीत करण्यात आले आहे. कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनचे ते सक्रिय सदस्य आहेत.

इंद्रजित शिवप्रसाद भोसले

इंद्रजित शिवप्रसाद भोसले

फुटबॉल खेळाडू असलेल्या इंद्रजितने केंद्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण पीएफआरडीए परीक्षेत 6 हजार विद्यार्थ्यांमधून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिल्ली येथील पीएफआरडीए च्या कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापक या क्लासवन पदावर नियुक्ती झाली आहे.

संजय गोविंद पटेल

संजय गोविंद पटेल

रेसिंग मधील अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संजय यांनी गाजविल्या. सद्या रेसिंग करत नसले तरी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाचे अधिकृत पंच म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

जिनेंद्र किरण सांगावे

जिनेंद्र किरण सांगावे

सामान्य कुटुंबातील १३ वर्षाच्या मोटर स्पोर्टस रायडर जिनेंद्रने चेन्नई येथे झालेल्या एम आर एफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियन - 2023 स्पर्धेत नॅशनल चॅम्पियन किताब मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

कल्याणी कृष्णात पाटील

कल्याणी कृष्णात पाटील

पाडळी खुर्द येथील सामान्य कुटूंबातील कल्याणीची चीन मध्ये होणाऱ्या आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. वडील सुरक्षा रक्षक तर आई शेतमजूर असूनही तिने जिद्दीने या खेळात कोल्हापूरचा झेंडा अटकेपार नेला आहे.

गौरव चंद्रकांत घेवडे

गौरव चंद्रकांत घेवडे

हेल्थ केअर कन्सलटंट असलेले गौरव हे ग्लोबल शेपर्स कोल्हापूर हबचे क्युरेटर आहेत. त्‍यांनी स्विझर्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये क्लायमेट रियालिटी चॅलेंजचे विजेतेपद पटकाविले आहे.

अक्षय संदीप कारेकर

अक्षय संदीप कारेकर

डिप्लोमा इन स्पोर्टस् कोचिंग सायकलिंग या पदवी परीक्षेत देशात 3 रा क्रंमाक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील एकमेव सायकलिंगचे प्रशिक्षक म्हणून पतियाला येथे निवड झालेली होती. या कोर्ससाठी देशभरातील 30 खेळाडूंची निवड केली जाते. पात्रता परिक्षा, विशेष मुलाखत व त्यानंतर पंजाब येथे विविध अभ्यासक्रम पूर्ण करुन त्याने या पदवीमध्ये 3 रा क्रमांक मिळविला आहे.

प्रसाद प्रशांत क्षीरसागर

प्रसाद प्रशांत क्षीरसागर

स्टार स्पोर्टसच्या वतीने आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी मराठी समालोचक म्हणून निवड. तसेच प्रो कबड्डीसाठी सुध्दा सुत्रसंचालन केले. नाटकाचे स्टेज, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ते टीव्ही पर्यंतचा हा प्रवास उर्जादायी आहे.

अपूर्वा दिलीप शेलार

अपूर्वा दिलीप शेलार

शेतकरी कुटूंबातील अपूर्वा यांची एनसीसीच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये गर्ल्स कॅडेट इंस्ट्रक्टर म्हणून स्टाफ सिलेक्शन परीक्षेतून निवड झाली आहे. 1988 नंतर कोल्हापूर जिल्ह्यातून अशी निवड होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

दिग्वीजय शंकर पाटील

दिग्वीजय शंकर पाटील

गुवाहाटी येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या ब संघामध्ये निवड. पुणे येथील केडन्स अकॅडमीचा खेळाडू असून विनु मंकड क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघातून 81 च्या सरासरीने 648 धावा केल्या आहेत.

आरती ज्ञानोबा पाटील

आरती ज्ञानोबा पाटील

2019-20 चा राज्य दिव्यांग क्रीडा पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त - आरतीला २०२१-२२चा राज्य दिव्यांग क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून, ती मूळची उचगाव येथील आहे. तिचे वडील गवंडी असून, सुरुवातीला अॅथलेटिक्समधून ती स्पर्धेत उतरत होती. त्यानंतर तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण उषाराजे गर्ल्स हायस्कूल, तर बारावीपर्यंतचे विद्यापीठ हायस्कूलमधून झाले असून, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातून तिने पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिने राष्ट्रीय स्तरावर अकरा सुवर्ण, पाच रौप्य व दहा कांस्य, तर एशियन यूथ स्पर्धेत एक रौप्य व आठ कांस्यपदके पटकावली आहेत.  सत्तावीस आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सोनबा तानाजी गोंगाने

सोनबा तानाजी गोंगाने

सोनबाने शिवछत्रपती पुरस्कार मिळवून कुस्तीचा लौकिक वाढविला आहे. खुराकापोटी काही वर्षांपूर्वी त्याने कुस्तीला रामराम ठोकला होता. टेम्पो ड्रायव्हर म्हणून त्याने कामही सुरू केले होते. त्यानंतर पुन्हा पैलवान नलवडे व विजय बराटे यांचा सल्ला ऐकून त्याने लाल मातीत पाऊल ठेवत यशाचा धडाका कायम ठेवला. न्यू मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्याकडे मातीतील, तर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्याकडे मॅटवरील कुस्तीचे धडे गिरवले. त्याने ग्रीको रोमन व फ्री स्टाईल प्रकारात कौशल्य आत्मसात केले. मुंबई महापौर केसरी, युवा शक्ती किताबाचा तो मानकरी असून, राज्यस्तरीय पहिल्या खाशाबा जाधव युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो वजन गटात त्याने देशातील सर्वोत्कृष्ट पैलवानाचा मान मिळवला. सध्या सोनबा २३ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये नायब सुभेदार म्हणून सेवेत आहे.

स्वाती संजय शिंदे

स्वाती संजय शिंदे

शिवछत्रपती पुरस्कार विजेती मुरगूड येथील स्वाती ही सामान्य कुटुंबातील असून, तिने राष्ट्रीय स्तरावर सहा सुवर्ण, तीन रौप्य, तर दहा कांस्यपदके पटकावली आहेत. दिल्लीत झालेल्या ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने ५३ किलो गटात कांस्यपदक मिळवले, तर थायलंड येथे झालेल्या सब ज्युनिअर एशियन, तायचुंग (तैवान) येथील ज्युनिअर, बल्गेरियातील ५९ व्या आंतरराष्ट्रीय, तर मंगोलियातील सीनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पुणे येथून पूर्ण केले असून, शिवाजी विद्यापीठाची ती कला शाखेची पदवीधर आहे. सध्या ती एम.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचे धडे गिरवत आहे.

अश्विनी राजेंद्र मळगे

अश्विनी राजेंद्र मळगे

इचलकरंजीतील अश्विनी हिला २०१९-२० चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. तिचे वडील दुचाकीचे मेकॅनिक असून, त्यांचे गावात गॅरेज आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तिने वेटलिफ्टिंगमध्ये स्वतःला घडवले. सांगलीतील विश्वशांती व्यायाम मंडळात दाखल होऊन तिने वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला. प्रशिक्षक संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली ती राज्यस्तरावर वीस स्पर्धांत सहभागी झाली. कनिष्ठ राष्ट्रीय स्तरावर तिने चार सुवर्ण, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत दोन सुवर्ण, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदक पटकाविले. आंतरराज्य स्पर्धेत तिच्या नावावर एक सुवर्ण व एक रौप्यपदक आहे. उझबेकिस्तानमधील ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. क्लिन अँड जर्क प्रकारात तिचा राष्ट्रीय स्तरावर विक्रम आहे. तिने गंगाई गर्ल्स हायस्कूलमधून दहावी, तर कुरुंदवाडच्या दत्त कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. हातकणंगलेतील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातून तिने पदवी मिळवली.

सोनल सुनिल सावंत

सोनल सुनिल सावंत

दिंडनेर्ली येथील सेंट्रिंग कामगाराची मुलगी असलेल्या सोनल हिला २०२०- २१ चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला शालेय जीवनापासून पॉवरलिफ्टिंगची आवड होती. वडील पैलवान असल्याने त्यांनी तिला पॉवरलिफ्टिंगसाठी प्रोत्साहित केले. ईश्वरा वाडकर हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर न्यू कॉलेजमधून बारावी, तर शहाजी छत्रपती महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. उदयपूर (राजस्थान-२०१८), तुर्की (२०२१) व केरळ (भारत-२०२३) येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. तिला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर सहावेळा सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर नऊ सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्य तर राज्यस्तरावर ३५ हून अधिक सुवर्णपदके मिळविली आहेत. लातूरमधील दयानंद आर्टस महाविद्यालयातून एमए केल्यानंतर उदगीरमधील शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून ती शारीरिक शिक्षणशास्त्राचा अभ्यास करत आहे. सेंट्रल रेल्वेत द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. प्रशिक्षक विजय कांबळे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे

स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे

स्वप्नाली पाचवीपासून सॉफ्टबॉल खेळत आहे. गांधीनगरमधील कापड दुकानात काम करणाऱ्या चंद्रकांत वायदंडे यांची ती मुलगी असून, छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलमधून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महावीर महाविद्यालयातून तिने बीए इन फिजिकल एज्युकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय सहा स्पर्धात तिला प्रत्येकी दोन सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके मिळाली आहेत. तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तिने रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली आहे.

महेश भाऊसो गवंडी

महेश भाऊसो गवंडी

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या 36 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाने सादर केलेल्या ढोलू कुनिथा या नृत्यास महोत्सवाच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

स्वप्निल किरण जंत्रे

स्वप्निल किरण जंत्रे

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या 36 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाने सादर केलेल्या ढोलू कुनिथा या नृत्यास महोत्सवाच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

शिवम रामदास गेजगे

शिवम रामदास गेजगे

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या 36 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाने सादर केलेल्या ढोलू कुनिथा या नृत्यास महोत्सवाच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

यशराज सर्जेराव पाटणकर

यशराज सर्जेराव पाटणकर

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या 36 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाने सादर केलेल्या ढोलू कुनिथा या नृत्यास महोत्सवाच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

तुषार वसंत पाटील

तुषार वसंत पाटील

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या 36 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. या संघाने सादर केलेल्या ढोलू कुनिथा या नृत्यास महोत्सवाच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

अभय विजय हावळ

अभय विजय हावळ

पाश्चिमात्य समुहगीत प्रथम क्रमांक, लोकनृत्य प्रथम क्रमांक, लोकवाद्यवृंद मध्ये 3 रा क्रमांक पटकाविला

प्रतिक्षा विजय पोवार

प्रतिक्षा विजय पोवार

पाश्चिमात्य समुहगीत मध्ये प्रथम क्रमांक

हर्षदा पुंडलिक परिट

हर्षदा पुंडलिक परिट

पाश्चिमात्य समुहगीत मध्ये प्रथम क्रमांक

सुमंत संजय कुलकर्णी

सुमंत संजय कुलकर्णी

पाश्चिमात्य समुहगीत मध्ये प्रथम क्रमांक

सृष्टी श्रीधर रेडेकर

सृष्टी श्रीधर रेडेकर

मेहनतीच्या जोरावर काठमांडू येथील 16 व्या युवा आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. गावात ना मैदान, ना प्रशिक्षक असे असले तरी जिद्दीच्या जोरावर ध्येयाने झोकून देवून सराव करत हे यश मिळविले.

शुक्ला साताप्पा बिडकर

शुक्ला साताप्पा बिडकर

दिल्ली येथे मार्च 2023 मध्ये झालेल्या सिनिअर राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दिंडनेर्ली येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते शुक्ला साताप्पा बिडकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

सुजित बापूसो तिकोडे

सुजित बापूसो तिकोडे

तामिळनाडू येथे झालेल्या २१ व्या राष्ट्रीय फेडरेशन कप (२० वर्षांखालील) मुलांच्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुजितने ५ हजार मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तो वेस्टर्न रिजन स्पोर्टस फौंडेशनचा धावपटू असून त्याची दक्षिण कोरीयातील 20 व्या आशियायी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

अनिकेत सुभाष माने

अनिकेत सुभाष माने

कबनूर हायस्कूलचा माजी विद्यार्थी अनिकेत याने तामिळनाडू येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सुवर्ण पदक मिळविले आहे. मानकरी ठरलेला आहे. दक्षिण कोरीयातील 20 व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. अनिकेतने 2.10 मिटर इतकी उंच उडी मारुन हे सुवर्ण पदक मिळविले आहे.

दिक्षा जितेंद्र शिरगावकर

दिक्षा जितेंद्र शिरगावकर

दिक्षाने जर्मनी येथील विशेष ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. वैद्यकीय अपघातानंतर क्षमता कमी होवूनही तिने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.

सोनम उत्तम मस्कर

सोनम उत्तम मस्कर

दक्षिण कोरीया येथे ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशीप शुटींग स्पर्धेत (4 वर्षातून एकदा होणाऱ्या) सांघिक सुवर्णपदक, जर्मनी येथे वर्ल्डकप स्पर्धा जून 2023- सांघिक सुवर्णपदक, दक्षिण कोरीया जुलै 2023 वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेत सांघिक रौप्य पदक मिळविले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघात निवड.

ऋतुजा विजय पाटील

ऋतुजा विजय पाटील

गडहिंग्लज येथील एमआर हायस्कूलची विद्यार्थीनी असलेल्या ऋतुजाने 66 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 4 कि.मी. क्रॉसकंट्रीमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. तिचे वडील पानटपरी चालवितात. पण जिद्दीने तिने हे यश खेचून आणले आहे.

निखील सुरेश कदम

निखील सुरेश कदम

भारतातील नावाजलेला संघ मोहन बागान कडून इंडियन सॉकर लिगमध्ये सहभाग. तसेच संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड.

पवन विजय माळी

पवन विजय माळी

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड.

अरबाज जहाँगीर पेंढारी

अरबाज जहाँगीर पेंढारी

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

संकेत अनिल साळोखे

संकेत अनिल साळोखे

कोल्हापूरातील शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू असणाऱ्या संकेतने स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाचा ठसा उमटवला. संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात 3 वेळेला निवड झाली आहे.

पार्थ सचिन मिरगे

पार्थ सचिन मिरगे

नेपाळ येथे झालेल्या एशिया ट्रायथलॉन कप ज्युनिअर गटात रौप्यपदक पटकावले. तसेच भारतीय संघात निवड झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्र ऑलंपिक आणि इतर राज्य व राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत यश मिळविले आहे.

रिया सचिन पाटील

रिया सचिन पाटील

2022 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालांपिक स्विमींग स्पर्धेत सबज्युनिअर गटात 3 सुवर्णपदकासह सलग 2 ऱ्यावर्षी बेस्ट स्विमरचा किताब पटकाविला आहे. तसेच जुलै 2023 मध्ये दिल्ली येथील पहिल्या नॅशलन चॅम्पीयनशिप स्पर्धेत एक सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळविली आहेत. रियाची ही कामगीरी सेरेबल पाल्सी मुलांसाठी आदर्शवत आहे.

ऋतुराज प्रकाश पाटील

ऋतुराज प्रकाश पाटील

फेडरेशन कप पॉवर लिफ्टींग चॅम्पीयनशीप स्पर्धेमध्ये 105 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक. तसेच 2022 मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या नॅशलन सबज्युनिअर आणि मास्टर्स स्पर्धेत 3 रा क्रमांक पटकाविला आहे.

विराजबाला विक्रमसिंह भोसले

विराजबाला विक्रमसिंह भोसले

दिल्ली येथे झालेल्या ९ व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. 12 वर्षाखालील गटात 100 मीटर, 200 मीटर आणि 4 बाय 100 रिले प्रकारात तिने सुवर्ण पदक जिंकले आहे.

शुभांगी शिवाजी पाटील

शुभांगी शिवाजी पाटील

तुर्कीतील इस्तंबूल येथे झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना सुवर्णपदक पटकाविले आहे.

धनश्री संजय इंगळे

धनश्री संजय इंगळे

ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत धनश्री ने सिंगल लाठी प्रकारात सुवर्ण आणि डबल लाठी प्रकारात कास्य पदक मिळविले आहे.

ऋतुराज संजय इंगळे

ऋतुराज संजय इंगळे

ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत ऋतुराज ने सिंगल लाठी प्रकारात सुवर्ण आणि डबल लाठी प्रकारात रौप्य पदक मिळवीले आहे.

रिया नितीन पाटील

रिया नितीन पाटील

दक्षिण कोरिया येथील इंचीयोन येथे झालेल्या 20 वर्षांखालील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 4 बाय 400 रिले स्पर्धेत रियाचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक मिळविले आहे.

सुजल विश्वास पाटील

सुजल विश्वास पाटील

दिल्ली येथील शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 81 किलो वजनी गटात सुजलने 101 आणि 130 असे एकूण 231 किलो वजन उचलून कास्यपदक पटकाविले आहे.

हर्षवर्धन दिगंबर कदम

हर्षवर्धन दिगंबर कदम

दिल्ली येथील राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 102 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. तो हारक्युलस जीमचा खेळाडू आहे. वृत्तपत्र विक्रेते दिगंबर कदम यांचा मुलगा आहे.

सार्थक अशोक गायकवाड

सार्थक अशोक गायकवाड

चेन्नई येथे झालेल्या ऑल इंडिया सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत 14 वर्षाखालील दुहेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत विजेते पद मिळविले.

ज्ञानेश्वरी जयवीर पाटील

ज्ञानेश्वरी जयवीर पाटील

मेरठ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत 10 मिटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकाविले आहे.

संतोष सर्जेराव रांजगणे

संतोष सर्जेराव रांजगणे

भारतीय व्हिलचेअर संघाचा खेळाडू असलेल्या संतोष यांनी भारत आणि बांगलादेश व्हिलचेअर क्रिकेट सिरीज 2023 या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांच्या संघाविरध्द भारताकडून खेळला आहे.