2025
हार्दिक अभिनंदन !
ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव 2025
मा. सुरेश शिपूरकर
मा. सुरेश शिपूरकर
श्रीमती शैलजा साळोखे
श्रीमती शैलजा साळोखे
ब्रँड कोल्हापूर 2025
श्री. स्वप्निल कुसाळे
श्री. स्वप्निल कुसाळे
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील शेतकरी कुटूंबातील स्वप्निल कुसाळे यांनी 2024 च्या पॅरिस ऑलंपिक मध्ये 50 मीटर रायफल फ्रि पुजीशन स्पर्धेत ब्राँझ मेडल प्रात्प करुन संपूर्ण देशाची आणि कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली. खाशाबा जाधव यांच्यानंतर 72 वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलंपिक मध्ये स्वप्निलच्या रुपाने असे पदक जिंकले.
श्री. कृष्णात खोत
श्री. कृष्णात खोत
मुळचे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी गावचे सुपूत्र मराठीतील नामवंत साहित्यीक असलेल्या श्री. खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या कादंबरीमध्ये विस्थापितांचा संघर्ष, त्यांच्या जीवनातील अडचणी आणि निसर्गाशी नाते अत्यंत नेमक्या शब्दात मांडले आहे.
श्री. सचिन सुर्यवंशी
श्री. सचिन सुर्यवंशी
कोल्हापूरच्या कासारवाडा येथील सचिन सुर्यवंशी यांच्या कोल्हापूरातील मर्दानी खेळावर आधारीत वारसा या माहिती पटाला सर्वोत्कृष्ट कला या प्रकारात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2019 मध्ये त्यांनी बनविलेल्या द सॉकर सिटी या फुटबॉलवर आधारीत माहिती पटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
श्री. बिरदेव डोणे
श्री. बिरदेव डोणे
कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळ कुटूंबातील बिरदेव यांनी यूपीएससी स्पर्धेत 591 वा रँक मिळविला. या स्पर्धेचा निकाल लागला त्यावेळी ते आपल्या मेंढ्या चारण्याच्या कामात व्यस्त होते. COEP येथून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी मिळविलेल्या बिरदेव यांचे यश हे सामान्य कुटूंबातील मुलांना प्रेरणा देणारे आहे.
श्री. सौरभ पाटील
श्री. सौरभ पाटील
करवीर तालुक्यातील चुये येथील सौरभ रामचंद्र पाटील यांनी कष्ट व स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर 2023 च्या यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात स्वयंअध्यनातून सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडट (क्लासवन ऑफिसर) पदावर ऑल इंडिया ६८ वी रैंक मिळवून यशाला गवसणी घातली आहे. त्यांनी पुणे येथील सिंहगड कॉलेजमधून बी.टेक इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून यापूर्वी त्यांनी एमपीएससी परीक्षेतून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असिस्टंट मैनेजर पदावर करत होते. तसेच त्यांनी दिल्ली मंत्रालयात दोन वर्षे गुप्तहेर खात्यात कामही केलेले आहे.
श्री. हेमराज पणोरेकर
श्री. हेमराज पणोरेकर
हेमराज हिंदुराव पनोरेकर या करवीर तालुक्यातील बालिंगा येथील एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या जिद्दी तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २२२ वी रैंक मिळवून क्लासवन अधिकारी बनण्याचा लौकीक करून दाखवला. ना कोणता क्लास ना कोणते कोचिंग फक्त स्वअध्ययनाच्या बळावर त्याने कोल्हापूरचा झेंडा युपीएससी मध्ये रोवला आहे.
श्री. दिलीपकुमार देसाई
श्री. दिलीपकुमार देसाई
अवघ्या 450 लोकवस्तीच्या जांभूळवाडी या गडहिंग्लज तालुक्यातील खेड्यातील दिलीपकुमार देसाई यांनी युपीएससीमध्ये यश मिळवून अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. दुर्गम भागातून शिक्षण आणि स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देसाई यांचं हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.
आदिती चौगुले
आदिती चौगुले
जयसिंगपूरच्या आदिती संजय चौगुले यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच IAS अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. दृढ निश्चय, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं असून UPSC परीक्षेत देशात 63 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. त्यांचं हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे.
श्री. मयुर कुलकर्णी
श्री. मयुर कुलकर्णी
कलानिकेतन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या मयुर यांनी जाहीरात, ब्रँडींग, ग्राफीक्स डिझाईन क्षेत्रात नाव कमाविलेले आहे. स्विट मून या त्यांच्या नव्या शॉर्ट फिल्मने आतापर्यंत 22 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. 50 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या फिल्मचे स्क्रिनींग झालेले आहे. कोल्हापूरचं नाव आंतराराष्ट्रीय स्तरावर गौरवनारी ही पहिली शॉर्ट फिल्म आहे. चिन येथील शांघाय इंटरनॅशनल शॉर्ट विक मध्ये सर्वेात्तम प्रयोगशील चित्रपट, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एशियन कंटेंट ॲन्ड फिल्म मार्केट, इंग्लंडमधील एलेवेशन फिल्म फेस्टिवल मध्ये विशेष उल्लेख. जर्मन येथील इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वेात्कृष्ट लघुपट नामांकन.
श्री. प्रशांत बिडकर
श्री. प्रशांत बिडकर
कोल्हापूर आर्ट स्कूलचा डंका आजवर अनेक दिग्गजांनी केला.. कलादिग्दर्शनाची तिसरी पिढी म्हणून कलादिग्दर्शक प्रशांत बिडकर यांच्याकडे पाहिले जाते.जी.डी.आर्ट शिक्षण घेत आजवर 40 हून अधिक मराठी , हिंदी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केले.व्ही.शांताराम पुरस्कार ,प्रभात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार. या वर्षी नॅशनल अॅवार्ड ट्वेटल्थ फेल या हिंदी चित्रपटासाठी नॉमिनेशन, तर झी सिने अवार्ड विजेता .. हिंदी दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा यांच्या कंपनीसोबत काम करत आहेत.
श्री. दिलीप रोकडे
श्री. दिलीप रोकडे
राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील दिलीप रोकडे यांनी छत्रपती संभाजी राजे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या छावा या चित्रपटाचे कलादिग्दर्शन केले आहे. तारळे येथे शिक्षण घेतलेल्या दिलीप यांनी गावातील अनेक गणपती मंडळांच्या कार्यक्रमात कलात्मक सजावट केली होती. पार्टटाईम नोकरी करत पुढील शिक्षण पूर्ण केले. बॉलीवूडच्या चंदेरी दुनयेत 12 वर्षे कार्यरत असणाऱ्या दिलीप यांची आपल्या मातीशी मात्र नाळ जोडलेली आहे. आजपर्यंत त्यांनी रामलिला, तनु वेड्स मनू 2, पद्मावत, सुपर 30, फँटम, तेजस भूतनाथ 2 या फिल्मसाठी सुध्दा कलादिग्दर्शन केले आहे.
श्री. झेवीयर पासकू रेगे
श्री. झेवीयर पासकू रेगे
गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीचे सुपूत्र असलेल्या झेवीयर रेगे यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून कार्यरत असताना ऑपरेशन सिंदूर मध्ये मोलाची भूमिका निभावली. राफेल या अत्याधुनिक विमानाचे ते पायलट आहेत. 17 स्कॉडरन वायूसेने मध्ये अत्यंत गौरवशाली काम केल्याबद्दल वेस्टर्न एअर कमांडच्या एअर मार्शल यांनी त्यांचा विशेष गौरव देखील केला आहे.
श्रीमती प्रियंका खोत
श्रीमती प्रियंका खोत
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तारदाळ येथील प्रियंका खोत यांनी इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदापर्यंत झेप घेतली आहे. सासऱ्यांचे अकाली निधन देशसेवेत असताना पती निलेश यांचे ह्रदय विकाराने निधन अशा प्रसंगांवर मात करुन खडतर प्रशिक्षण पूर्ण करत प्रियंका यांनी भारतीय सैन्यात कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. अडीच वर्षाची मुलगी श्राव्या हिला आपल्या कुटूंबाकडे ठेवून त्यांनी आर्मीतील ट्रेनिंगही पूर्ण केले. वीर पत्नीच्या कोट्यातून भारतातून अवघी एक जागा असलेल्या पदावर त्यांची निवड झाली आहे.
श्रेया मिलिंद देसाई
श्रेया मिलिंद देसाई
खडतर परीश्रम जिद्द चिकाटी आणि आईवडीलांच्या पाठबळावर मुळची नेसरी येथील श्रेया मिलींद देसाई हिची इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलीने कार्यरत होण्याचा अभिमान आई-वडीलांना निश्चितपणे आहे.
श्री. यश अमर मार्ले
श्री. यश अमर मार्ले
इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही फायटर पायलट पदासाठी यश रिकेमंड झाला आहे. यासाठी अत्यंत खडतर परीश्रम त्याने घेतले आहे. गेली वर्षभर जॉब करत असताना या परीक्षेसाठी तो लिव्ह घेवून जात होता. या कंपनीमध्ये सुध्दा त्याला बेस्ट इंजिनिअर हे ॲवार्ड मिळाले आहे.
श्री. सागर बगाडे
श्री. सागर बगाडे
सागर बगाडे सोलापूरच्या रेल्वे फलाट वरच अनाथपन, पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रम मधील बालपण आणि त्यानंतर बगाडे परिवारात दत्तक घेतल्यावर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कोल्हापूरचे नाव गाजविणारे, पोरांचे लाडके मास्तर, ज्यांना 2024 साली राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले गेले.. चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, वंचितांचे आधार, अनाथांचे नाथ अशा अनेक भूमिकांमधून व्यक्त होणारे आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर देशाच्या पंतप्रधानांशी तितक्याच ताकतीने वार्तालाप केलेले प्रसिद्ध शिक्षक.. 14 वर्षांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला सागर बगाडे यांच्या रूपाने मिळाला आणि या अवार्ड च्या इतिहासात 1976 पासून भारतात पहिल्यांदा एक कलाशिक्षक याचा मानकरी ठरलाय.
श्री. विवेक चंदालिया
श्री. विवेक चंदालिया
श्री. विवेक चिमनभाई चंदालिया हे कोल्हापूरतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व ते शिक्षक, प्रशिक्षक, लेखक, मार्गदर्शक, समाजसेवक आणि चित्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी आय टी आय कोल्हापूर , सोलापूर आणि कडेगाव - जिल्हा सांगली या ठिकाणी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार तर्फे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. गेले २८ वर्षात हजारो विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण तसेच व्यवसाय अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थ्यांसाठी मराठी भाषेत थेअरी विषयाचे पुस्तके प्रकाशित केली असून त्यांनी लिहिलेली पुस्तके व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपयुक्त ठरली आहेत. महाराष्ट्र शासनाकडून २०१२-१३ चा 'राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार' देखिल प्राप्त आहे. ते स्वत: उत्तम व्हालीबॉल पटटू आणि प्रशिक्षक आहेत.
श्री. विश्वजित काशिद
श्री. विश्वजित काशिद
विश्वजित काशिद हे O negative blood group चा प्लेटलेट donar असून 184 वेळा प्लेटलेट doante करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. भूतलावरील एकमेव व्यक्ती ज्याने Granulocytes Donation 12 वेळा केलेलं आहे. देशातील प्लेटलेट डोनेशन साठी काम करणाऱ्या फाउंडेशनचा संस्थापक TED X sepaker म्हणून प्रसिध्द आहे.
श्री. मंगेश देसाई
श्री. मंगेश देसाई
इंजीनियर असलेल्या मंगेश देसाई यांना निसर्ग छायाचित्रणाची आवड असून त्यांनी भारतातील विविध वन्यप्राणी आणि निसर्गाचे दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एनबीपी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत मंगेश यांनी काढलेल्या ताडोबा अभयारण्यातील माया वाघिणीचा पाण्यात खेळत असतानाचा छायाचित्राची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जगभऱातील 62 देशांमधून 35 हजारांहून अधिक छाया चित्रे या स्पर्धेत सहभागी झाली होते.
श्री. दिगंत पाटील
श्री. दिगंत पाटील
सरवडे ता. राधानगरी येथील दिगंत पाटील या नवोदित लेखकाने आपला प्रवासस तरूणांसाठी प्रेरणादायी बनवला आहे. स्क्रिन रायटर्स असोसियेशन पुरस्कार 2025 मध्ये दिगंत पाटील आणि त्याच्या टिमने कथा लिहिलेल्या अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बंदीश बँडिट्स सीजन- 2 या वेब सीरीजला बेस्ट स्टोरी अवॉर्ड मिळाला आहे. संगीतावर 103 वेबसीरीजमधून 5 सीरीजना या साठी नॉमिनेशन मिळाले होते. दिगंतचा पटकथा आणि कथालेखनात मोठा वाटा आहे.
श्री. अर्णव कारेकर
श्री. अर्णव कारेकर
कोल्हापूरातील तरुण डिझायनर अर्णव कारेकर यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथे उच्च शिक्षण घेत असताना तयार केलेली दोन अद्वितीय डिझाईन चतुररथ आणि विश्वरुपम आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली आहेत. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ॲक्सीयम-4 मोहिमे दरम्यान आयएसएसला भेट देताना ही स्मृतीचिन्हे सोबत नेली. ही दोन्सी स्मृतीचिन्हे कोल्हापूरातच तयार करण्यात आली असून यामुळे कोल्हापूरची समृध्द हस्तकला परंपरा आणि सुवर्ण कारागीरांचे कौशल्य थेट अवकाशात झळकले आहे. एकूण 250 डिझाईन मधून या डिझाईनची निवड झाली आहे.
श्री. अभिषेक निषाद
श्री. अभिषेक निषाद
कोल्हापूरचा युवा क्रिकेटपटू अभिषेक निषाद याला बीसीसीआय तर्फे देण्यात येणारा एमए चिदंबरम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याने कुचबिहार स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना 7 सामन्यात 44 गडी बाद करत भारतातील अव्वल गोलंदाज ठरला होता. कोल्हापूर जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या 55 वर्षाच्या इतिहासात प्रथमच बीसीसीआयचा पुरस्कार कोल्हापूरच्या खेळाडूला मिळाला आहे.
राजकुंवर प्रणिल इंगळे
राजकुंवर प्रणिल इंगळे
कझाकिस्तान येथे १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या "एशियन शूटिंग चॅम्पियनशिप" स्पर्धेत कोल्हापूरच्या राजकुंवर प्रनिल इंगळे हिने सिनियर गटातील "शॉटगन डबल ट्रॅप" प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावलं. याच प्रकारात भारतीय मुलींच्या संघाने एकूण गुणांवर गोल्ड मेडल जिंकलं
श्री. चेतन चव्हाण
श्री. चेतन चव्हाण
कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या चेतन यांनी गेल्या 7 वर्षापासून मॅराथॉन आणि ट्रायथोलॉन स्पर्धा आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेत 2025 मध्ये झालेल्या कॉमरेड्स रण मधील 90 कि.मी. अंतर 10 तास 28 मिनिटात पूर्ण केले आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रिया येथील स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब त्यांनी मिळवला आहे. मुंबई येथील टाटा मॅराथॉन 6 वेळा पूर्ण केली आहे. तसेच 50 ते 65 कि.मी. अंतराच्या 4 अल्ट्रा मॅराथॉन याबाबरोबरच अनेक हाफ मॅराथॉन पूर्ण केल्या आहेत.
श्री. पंकज रावळू
श्री. पंकज रावळू
आतापर्यंत 8 वेळा फुल आयर्न मॅन पूर्ण केली आहे. ऑस्ट्रेलिया येथील आयर्न मॅन स्पर्धा 9 तास 57 मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. अनेक आयर्न मॅन स्पर्धेमध्ये बक्षीसे सुध्दा जिंकली आहेत.
माहेश्वरी झुंजार सरनोबत
माहेश्वरी झुंजार सरनोबत
फिटनेसची आवड असलेल्या माहेश्वरी यांनी अत्यंत कठीण असलेली आणि युरोपमधील इस्टोनिया येथे आयोजित स्पर्धा पूर्ण करत आयर्न मॅन हा किताब पटकाविला आहे. यापूर्वी त्यांनी मेलबर्न येथील आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा देखील पूर्ण केलेली आहे. यापूर्वी समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल तसेच वयोगटातील पोहण्याच्या स्पर्धे राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवले आहे. अनेक मॅराथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद मिळविलेले आहे.
श्री. अभिनंदन चिंचवाडे
श्री. अभिनंदन चिंचवाडे
आदिनाथ बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या अभिनंदन यांनी दक्षिण कोरीयामध्ये झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब मिळविला आहे. 14 तास 49 मिनिटीत ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली आहे (पावणे चार कि.मी. पोहणे, 180 कि.मी. सायकलींग, 42.2 कि.मी धावणे).
श्री. तनय सोहनी
श्री. तनय सोहनी
आयर्न मॅन ऑस्ट्रेलिया फिनिशर - 13 तास 18 मिनिटे, 2 वेळेस हाफ आयर्न मॅन फिनिशर, 3 वेळा ऑलंपिक ट्रायथोलॉन, नॅशनल स्विमर.
श्री. राजवर्धन सचिन घाटगे
श्री. राजवर्धन सचिन घाटगे
वेस्टन ऑस्ट्रेलिया 2024 आयर्न मॅन किताब - 12 तास 11 मिनिटे 30 सेकंद, आयर्न मॅन गोवा 70.3 फिनिशर 2022, हाफ आयर्न मॅन 3 वेळा फिनिशर
श्री. अमोल यादव
श्री. अमोल यादव
एंड्युरन्स ऍथलीट व अल्ट्रा रनर, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला कॉम्रेड्स रनर, कॉम्रेड्स मॅरेथॉन २०२५ दक्षिण आफ्रिका – भारताचा ४था वेगवान धावपटू व Bill Rowan पदक विजेता (टाइम 7 तास 51 मिनिटे) , कॉम्रेड्स मॅरेथॉन 2024 दक्षिण आफ्रिका – भारताचा 4 था वेगवान धावपटू व Bill Rowan पदक विजेता (टाइम 8तास 22 मिनिटे 10 सेकंद) , टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 – बॉस्टन (अमेरिका) पात्रता प्राप्त , टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 75 किमी एकूण 4 था क्रमांक वेळ 6 तास 28 मिनिटे )
डॉ. विजय कुलकर्णी
डॉ. विजय कुलकर्णी
एमबीबीएस एमडी मायक्रोबायोलॉजी असणारे डॉ. कुलकर्णी यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन 10 तास 52 मिनिटात पूर्ण केली. 2018 मध्ये ऑस्ट्रीया येथे आयर्न मॅन, 50 कि.मी. पेक्षा जास्त असणाऱ्या अल्ट्रा मॅरोथॉन तसेच 5 वेळा मुंबई-गोवा फुल मॅरोथॉन, 10 हून अधिक वेळा हाफ मॅरोथॉन, आणि खूपदा 10 कि.मी. मॅरोथॉन पूर्ण केले आहे.
श्री. दिलीप जाधव
श्री. दिलीप जाधव
दिलीप जाधव हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांनी २ फुल मॅरेथॉन, २० पेक्षा अधिक हाफ मॅरेथॉन, अनेक अल्ट्रा रन पूर्ण केल्या आहेत. ९० कि.मी.ची कॉम्रेड्स मॅरेथॉन त्यांनी ११ तासांच्या आत यशस्वीपणे पूर्ण केली आहे..
श्री. गोरख माळी
श्री. गोरख माळी
मेकॅनिकल इंजिनिअर - अल्ट्रा मॅरोथॉन रनर, दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन पूर्ण केली.
श्री. सचिन बुरसे
श्री. सचिन बुरसे
इचलकरंजी येथील सचिन बुरसे यांनी कॉम्रेड्स मॅरेथॉन 2025 90 किलोमीटर टाईम 8 तास 15 मिनिटे 52 भारतीय धावपटू मधून 6 क्रमांक( बिल रोवन पदक , नऊ दिवसात 301 किलोमीटर रन ,टाटा मुंबई मॅरेथॉन 42.195 किलोमीटर 3 वेळा पूर्ण ,टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 2वेळा पूर्ण, सलग 5 वेळा सातारा हिल मॅरेथॉन गोल्ड मेडल, 100 किलोमीटर 2 वेळा
श्री. स्वरुप पुजारी
श्री. स्वरुप पुजारी
नरसोबावाडी येथील श्री दत्त मंदीराचे पूजारी दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन 11 तास 44 मिनिटात पूर्ण केली. अल्ट्रा मॅरोथॉन 2 वेळेस, फुल मॅरोथॉन 2 वेळा, हाफ मॅरोथॉन 15 वेळा पूर्ण केली आहे.
श्री. विजय पाटील
श्री. विजय पाटील
श्री. विजय शरद पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामध्ये ग्रामविकास अधिकारी या पदावर गेली बावीस वर्षे जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.. त्यांनी 2021 पासून एकूण 45 पेक्षा जास्त मॅरेथॉनमध्ये मेडल प्राप्त केली आहेत.. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच त्यांनी आंतरराष्ट्रीय पदक मिळवून जिल्हा परिषद कोल्हापूर ची मान उंचावली आहे..
श्री. आम्रपाल कोहली
श्री. आम्रपाल कोहली
एके फिटनेस फॅक्टरीज स्पोर्टस क्लब इचलकरंजीचे संस्थापक दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन पूर्ण केली. मलेशिया आयर्न मॅन, गोवा 70.3 फिनिशर, अनेक अल्ट्रा रन पूर्ण, 12 पेक्षा जास्त फुल मॅरोथॉन, 40 पेक्षा जास्त हाफ मॅरोथॉन पूर्ण केली आहे.
सौ. सुषमा रेपे
सौ. सुषमा रेपे
सांगली येथे डेप्यूटी आरटीओ म्हणून कार्यरत. दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन पूर्ण केली. 20 पेक्षा जास्त हाफ मॅरोथॉन, 20 पेक्षा जास्त वेळेस 10 कि.मी. मॅरोथॉन पूर्ण, 70.3 डूएथ लॉन फिनिशर, 50 कि.मी. पेक्षा जास्त अंतराचे अल्ट्रा रन्स 5 वेळा पूर्ण केले..
डॉ. केतकी सचिन साखरपे
डॉ. केतकी सचिन साखरपे
स्त्रीरोग तज्ञ म्हणून इचलकरंजी येथे कार्यरत. दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स रन पूर्ण केली. 10 तास 56 मिनीटात पूर्ण (ब्रॉन्झ मेडल), 20 पेक्षा जास्त हाफ मॅरोथॉन तसेच अनेक फुल मॅरोथॉन आणि अल्ट्रा मॅरोथॉन फिनिशर.
डॉ. पराग वाटवे
डॉ. पराग वाटवे
डॉ. पराग वातवे हे मुखगुहा, थायरॉईड, लाळग्रंथी, घशाचा (लॅरिंक्स) आणि सायनसचा कर्करोग उपचार करणारे हेड अँड नेक ऑनको-सर्जन आहेत. अचूकतेसह करुणेचा संगम साधणाऱ्या त्यांच्या उपचार पद्धतीमुळे ते रुग्णांना आशा आणि आरोग्य दोन्ही देतात.ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ते एक उत्साही धावपटू आहेत, ज्यांचा विश्वास आहे की शिस्त आणि सहनशीलता या गुणांनी वैद्यक आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांना जोडले आहे.या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित ९० कि.मी. ‘कॉम्रेड्स अल्ट्रा-मॅरेथॉन’ यशस्वीपणे पूर्ण केली.
श्री. प्रतिक संजय पाटील
श्री. प्रतिक संजय पाटील
प्रतीक पाटील हे सायकलिंग करतात. त्यांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रोड रेस इव्हेंट प्रकारात – सुवर्णपदक, ITT इव्हेंट प्रकारात – रौप्यपदक पटकाविले आहेत. २७ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत – रोड रेसमध्ये वरिष्ठ गटात सुवर्णपदक, ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोड रेस आणि ट्रॅक इव्हेंटमध्ये सहभाग, २६ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रोड रेसमध्ये U23 गटात सुवर्णपदक व ITT स्पर्धेत ६ वा क्रमांक अशी अनेक पदके त्यांनी प्राप्त केलेली आहेत.
श्री. श्रीधर श्रीकांत निगडे
श्री. श्रीधर श्रीकांत निगडे
करवीर तालुक्यातील नागदेववाडी या गावातील शेतकरी कुटुंबातील दीपक हे नामवंत रग्बी खेळाडू आहेत. हाँगकाँग, चायना, कतार, श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी एक सुवर्णपदक मिळवले. शालेय राष्ट्रीय (U17/U19 ) स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रीय (U18-U19 )असोसिएशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, नॅशनल गेम्स स्पर्धेत दोन वेळा (व्दितीय क्रमांक), ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत (२ वेळा द्वितीय क्रमांक, एक वेळी तृतीय) असे राष्ट्रीय स्पर्धेत दहा पदक प्राप्त केली आहेत. त्याबरोबरच खेलो इंडिया युनिवर्सिटी स्पर्धेत (दोन वेळेस सुवर्णपदक) तसेच खेळाच्या माध्यमातून सेंट्रल गर्वमेंट पोस्ट खात्यात सॅार्टिंग असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली आहे..
श्री. अफ्रिद अत्तार
श्री. अफ्रिद अत्तार
करवीर तालुक्यातील उचगांव येथील अफ्रिद अत्तार यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तसेच युथ एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी करीत देशाला 5 आंतरराष्ट्रीय पदक मिळवून दिली आहेत. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया आणि वरिष्ठ राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत अनेक पदक जिंकली आहेत.
श्री. मानसिंग यशवंत पाटील
श्री. मानसिंग यशवंत पाटील
गेल्या नऊ वर्षात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी जलतरणपटू घडवणारे मानसिंग पाटील यांनी कोल्हापूरचं नाव मोठ केलं आहे. विशेष म्हणजे यात अनेक दिव्यांग जलतरणपटूंनाही त्यांनी प्रशिक्षण देऊन समाजात त्यांना वेगळी ओळख दिली. त्यांनी घडवलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंमध्ये अभिषेक जाधव, दीपक पाटील, सुमित कुरणे, प्रथमेश कापडे, संतोष कुंभार, शिवछत्रपती पुरस्कार विजेता पॅरा जलतरणपटू आफ्रीद अत्तार, अन्नपूर्णा कांबळे यांचा समावेश आहे.
श्री. पृथ्वीराज बाजीराव पाटील
श्री. पृथ्वीराज बाजीराव पाटील
पृथ्वीराज पाटील हा मूळचा करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा रहिवासी असून त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून कामाबरोबर गेली 10 वर्षे सातत्याने रग्बीचा सराव करीत आहे. आतापर्यंत अखिल भारतीय रम्बी, खेलो इंडिया, राष्ट्रीय खेल स्पर्धा, वरिष्ठ राष्ट्रीय अशा स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे.
कु. कल्याणी पाटील
कु. कल्याणी पाटील
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील कल्याणी हिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक आहेत. तिने जागतिक विद्यापीठ स्पर्धेत, तर एशियन गेम्समध्येही बहारदार कामगिरी करीत देशाला पदक मिळवून दिले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली आहे
कु. ऐश्वर्या रमेश पुरी
कु. ऐश्वर्या रमेश पुरी
शिवछत्रपती पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या ऐश्वर्या पुरी करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावच्या आहेत. त्या जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनची खेळाडू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 8 वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत, तसेच 4 अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी करत कोल्हापूरचं नाव उंचावलं आहे.
कु. सृष्टी जयवंत भोसले
कु. सृष्टी जयवंत भोसले
सृष्टी भोसले (महिला कुस्तीगीर) मूळच्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील सृष्टी भोसले यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसह वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी महिला वजनी गट, खेलो इंडिया आदी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे..
श्री. अभिषेक सुरेश निपाणे
श्री. अभिषेक सुरेश निपाणे
अभिषेक निपाणे (वेटलिफ्टर) राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक, तर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण आणि खेलो इंडिया स्पर्धेतही पदक विजेती कामगिरी करणारा अभिषेक निपाणे मूळचा कुरुंदवाडचा खेळाडू आहे. त्याने आंतरविद्यापीठीय स्पर्धेतही सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.
कु. अवंती बबन माने
कु. अवंती बबन माने
उषाराजे हायस्कूलची बाल चित्रकार अवंती हिने रेखाटलेल्या भारतीय संस्कृती : स्थानिक परंपरा व जीवनशैली या कलाकृतीला देशात 2 रा क्रमांक मिळाला आहे. भारतीय ऑलंपियाड फौंडेशन, नॅशलन कौशल्य कला ऑलंपियाड, नोयडा येथे छू लो आसमान सिझन 7 अंतर्गत झालेल्या स्पर्धेत देशभरातून 850 विद्यार्थी चित्रकार सहभागी झाले होते.